नांदेड, दि. १४ ऑगस्ट : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ रॅली तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग, श्री गुरुगोबिंदसिंघजी मेमोरियल जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स महाविद्यालय, नांदेड येथे ५ किलोमीटर धावणे स्पर्धा व हर घर तिरंगा रॅली घेण्यात आली. या उपक्रमाला जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सायन्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अरुणा शुक्ला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा चिकित्सक डॉ. पेरके, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे, जिल्हा एड्स विभागाचे संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी माधव सुगावकर यांच्यासह समुपदेशक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त तसेच आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहभागी खेळाडूंनी देशभक्तीपर घोषणा देत उत्साहात रॅली काढली.
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेड रनचा मुख्य उद्देश युवक-युवतींमध्ये एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व जनजागृती निर्माण करणे हा होता. १७ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी ५ किलोमीटर धावणे स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावलेल्या युवक-युवतींची २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ते नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१७ ते २५ वर्षे युवक – ५००० मीटर धावणे
- प्रथम : तन्मय भिमराव सोनाळे
- द्वितीय : राजेश गणेश कासारे
- तृतीय : वैभव मारोती बोकारे
१७ ते २५ वर्षे युवती – ५००० मीटर धावणे
- प्रथम : मोनिका किशनराव नाईक
- द्वितीय : देवसर साहेबराव जगदंबे
- तृतीय : विद्या गंगाधर साठे
स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रलोभ कुलकर्णी, सचिव, हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव दमकोडवार, बंटी सोनसळे, वैभव अंभोरे, मोहम्मद अन्वर आदींनी काम पाहिले.
जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे व जिल्हा एड्स विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी.आर. होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहिणी घंटेवाड, संजय चव्हाण, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे तसेच आरोग्य विभागाचे सोपान ईभीते, प्रकाश झिंझाडे, सुमित सूर्यवंशी, गंगासागर हिंगोले, धाराजी हिंगोले आदींनी स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.




No comments: